या उत्सव प्रसंगी विविध भागातून आलेल्या भजनी
दड्यांना १० टाळजोड, १
वीणा, १ मृदंग, १ हातोडी, संत वाङमय (श्री ज्ञानेश्वरी ग्रंथ, श्री तुकाराम महाराज गाथा, श्री एकनाथी भागवत ग्रंथ)साहित्याचे वितरण करण्यात येते. आता पर्यंत महाराष्ट्र व महाराष्ट्राबाहेरील अशा एकूण
७६ जिल्हयातील विविध गांवातून आलेल्या एकूण
१८,८२२ भजनी
दिंड्यांना भजनी साहित्याचे वितरण करण्यात आले आहे.
या भजनी साहित्य मिळालेल्या प्रत्येक गावात
संप्रदायाच्या नियमाप्रमाणे, रोज नित्याचा हरिपाठ, भजन, काकडा
आरती, दशमीची
दिंडी परिक्रमा, कीर्तनादी कार्यक्रम व्हावेत व त्यामध्ये एकसूत्रता यावी म्हणून ‘वारकरी प्रशिक्षण शिबिर‘ हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे.
याकरिता वर्ग ८ ते १२ वी शिक्षण असलेल्या तसेच आआर्थिक
दुर्बलस्थितीमुळे पुढे शिक्षण घेवू न शकलेल्या
वयवर्षे १५ ते ३० अशा वयोगटातील विद्यार्थ्यांना ‘वारकरी
प्रशिक्षण‘ देण्यात येत आहे. या शिबिराचा प्रशिक्षण कालावधी १ महिन्याचा असून मुलांची नि:शुल्क निवास, भोजनादी व्यवस्था श्री संस्थेमार्फत केली जाते.
संस्थानात संपन्न
होणाऱ्या तीन मुख्य उत्सवामध्ये सहभागी
होणाऱ्या भजनी
दिंड्यांमधून वरील पात्रता व इच्छूक असलेल्या प्रत्येक
दडीतील कमीत कमी १०
विद्यार्थ्यांना बोलावून त्यांची मुलाखती नंतर वारकरी प्रशिक्षण शिबीराकरीता निवड करून प्रवेशाची तारीख दिली जाते.
प्रशिक्षण संपल्यानंतर प्रशिक्षणार्थींना वारकरी प्रशिक्षण शिबिर प्रमाणपत्र, १५०० रू. शिष्यवृत्ती व इतर भेट वस्तू दिल्या जातात.
आतापर्यंत
१०३ शिबिर-सत्र संपन्न झाले आहेत. या शिबीरामधून
६१७६ प्रशिक्षणार्थी ‘‘वारकरी प्रशिक्षण‘‘ संपन्न करून बाहेर पडले आहेत. त्यांचे गावी प्रशिक्षणातील सद्गुणांचा उपयोग होऊन परिवर्तन होताना दिसत आहे.
टिप :- या शिबिरामध्ये शिक्षकांकडून प्रवचन, कीर्तन, मृदंग वादन, गायन, पाऊली व इतर सहिष्णूवृत्तीचे शिक्षण दिले जाते.
|