धार्मिक व आध्यात्मिक शिबिरे
आध्यात्मिक साधना शिबिरे :-
वर्षभरातील कार्यक्रमांचे नियोजन पाहून इतरही धार्मिक क्षेत्रातील आध्यात्मिक शिबिरे घेतली जातात. आध्यात्मिक साधना शिबिर हे दरवर्षी आयोजित करण्यात येते. हे शिबीर सर्वांच्या सोयीच्या दृष्टीने भाद्रपद वद्य पक्षांत (सप्टेंबर किंवा आक्टोंबर) महीन्यात असते.
शिबिरार्थी संख्या अंदाजे ८५० ते ९००
पर्यंत असते. विदर्भ, महाराष्ट्र, मध्यप्रदेश, छत्तीसगढ, गुजरात इत्यादी प्रांतातील महिला शिबिरार्थी व पुरूष शिबिरार्थी यांचा शिबिरात सहभाग असतो.
शिबिरार्थी यांचे आध्यात्मिक मार्गदर्शनाकरीता रायपूर, नागपूर, इंदौर, औरंगाबाद, चेन्नई, अहमदाबाद, येथील श्री रामकृष्ण मिशन मधील स्वामीजींना निमंत्रीत करण्यात येते.
शिबिरार्थींचे ध्यानधारणा, गीतापाठ, प्रवचनाव्दारे उदबोधन करण्यात येते. शिबिरार्थींना काही प्रश्न विचारावयाचे असल्यास स्वामीजी त्याला समर्पक उत्तरे देवून शिबिरार्थीचे शंका निरसन करतात.
३ दिवस चालणाया या शिबीरार्थींचे निवास, भोजन, नास्ता, चहापाणी व्यवस्था संस्थानतर्फे विनामूल्य करण्यात येते. सर्वांना लाडूप्रसाद पुडी देऊन शिबीराचा समारोप होतो.
|