संस्थानचे विविध क्षेत्रातील सेवाकार्य

..................................................................................................................................................................................................................................................

आध्यात्मिक क्षेत्रातील कार्यामध्ये खालील सेवाकार्य अंतर्भुत आहे.

वारकरी शिक्षण संस्था

संस्थानातील धार्मिक कार्यक्रम/पालखी सोहळा

भजनी साहित्य वितरण

वारकरी प्रशिक्षण शिबीर

धार्मिक व आध्यात्मिक शिबीरे

भजनी साहित्य वितरण

संत मंडळींनी ज्या वारकरी संप्रदायाचा गौरवाने पुनरुच्चार केला, त्या संप्रदायास व्यापक परिणाम मिळवून देण्यासाठी संस्थानने वारकरी शिक्षण संस्थेची स्थापना केली आहे. वारकरी संप्रदायाबद्दल विशेष महत्व असल्याने संस्थानतर्फे विविध गावांमधील भजनी दिंड्यांना नियमानुसार पूर्तता केल्यानंतर १० टाळजोड, १ मृदंग, १ वीणा असे भजनी साहित्य विनामूल्य वितरित करण्यात येते. तसेच वारकरी दिंड्यांना आवश्यकतेनुसार श्री ज्ञानेश्वरी, श्री एकनाथी भागवत तसेच श्री तुकाराम गाथा यांसारख्या अजोड व अद्वितीय ग्रंथांच्या प्रतींचे विनामूल्य वितरण केले जाते. या सेवा कार्यामुळे गावोगावी भजने, हरिपाठ, काकडा, कीर्तने हे धार्मिक कार्य सुरू होवून सनातन वारकरी संप्रदायाचा प्रसार, प्रचार होवून असंख्य लोक भक्तीचा आनंद घेत असल्याचे सर्वांनाच दिसत आहे. हे आध्यात्मिक सेवाकार्य फार मह्त्वपूर्ण असून याव्दारे धर्म, संस्कृती व ध्यात्म यांचे जतन श्री गजानन महाराज संस्थानव्दारे करवून घेत आहेत. आज पर्यंत एकूण १८,८२२ दिंडयांना भजनी साहित्य वितरित करण्यात आले आहे.

श्री प्रगटदिन उत्सव, श्रीराम नवमी उत्सव, श्री पुण्यतिथी उत्सव या उत्सवामध्ये सहभागी होणाऱ्या दिंड्यांना भजनी साहित्य व संत वाङमयाचे वितरणाकरीता संस्थेने काही नियम व अटी केलेल्या आहेत. त्या खालीलप्रमाणे.

नियम व अटी :-

१. आपणास यापूर्वी महिला किंवा पुरुष भजनी मंडळास भजनी साहित्य मिळाले नाही व आपले जवळ स्वत:चे भजनी साहित्य नाही, याबाबत सरपंचाचा दाखला.
२. वरील मुद्दा धरून पोलीस पाटलांचा दाखला.
३. आपल्या भागातील वारकरी संप्रदायातील अधिकारी व्यक्ती जसे कीर्तनकार, प्रवचनकार, भागवतकार यांचे लेखी शिफारस पत्र.
४. ज्या बुवांकडून माळ घातली असेल त्यांचे शिफारस पत्र.
५. दींडीतील वारकरी मंडळीची पूर्ण नांवे, पत्ता व सर्वांचा सामूहिक फोटो.
६. गावामध्ये भजनी साहित्य मिळालेले असून सुध्दा लोकसंख्या ५००० चे वर असल्यास व भजनी साहित्य कमी पडत असल्यास त्यासंबंधीचा सरपंचांचा दाखला.
७. एका गावात एकच भजनी साहित्य दिले जाईल. संस्थानचे नाव सांगून अगर संबंध दाखवून आपणास आपले गांवी काही सांगितले असेल अशा फसवेगिरीपासून सावध राहावे, संस्थेशी याबाबत पत्र व्यवहार करावा कवा प्रत्यक्ष संपर्क साधावा.

दाखल्यांचे स्वरूप

(१) - सरपंच दाखला -

मौजे ग्रामपंचायत ----------------- येथून दाखल देण्यात येतो की, सदरहू भजनी मंडळ आमचे गांवचे रहिवाशी असून त्यांना आता पावेतो इतर कोणत्याही संस्थेकडून तसेच श्री गजानन महाराज संस्थान, शेगांव कडून कोणत्याही प्रकारचे भजनी साहित्य मिळाले नाही व त्यांचे जवळ स्वत:चे सुध्दा भजनी साहित्य उपलब्ध नाही.
तरी त्यांना आपल्या संस्थानकडून नियमांनुसार भजनी साहित्य देण्यास काहीही हरकत नाही. करिता हा दाखला देण्यात येत आहे.

सरपंच
सही/शिक्का

(२) - पोलीस पाटील दाखला -

मौजे ग्रामपंचायत ----------------- येथून दाखल देण्यात येतो की, सदरहू भजनी मंडळ आमचे गांवचे रहिवाशी असून त्यांना आता पावेतो इतर कोणत्याही संस्थेकडून तसेच श्री गजानन महाराज संस्थान, शेगांव कडून कोणत्याही प्रकारचे भजनी साहित्य मिळाले नाही व त्यांचे जवळ स्वत:चे सुध्दा भजनी साहित्य उपलब्ध नाही.
तरी त्यांना आपल्या संस्थानकडून नियमांनुसार भजनी साहित्य देण्यास काहीही हरकत नाही,रिता हा दाखला देण्यात येत आहे.

पोलीसपाटील
सही/शिक्का

(३) - कीर्तनकार शिफारस पत्र -

मी खालील सही करणार श्री ह. भ. प. ---------------------------- (कीर्तनकार, भागवतकार) सदरहू भजनी मंडळास शिफारस पत्र देतो की या गांवी मी नैमित्तीक कीर्तन/भागवत आदी कार्यक्रमाकरीता जात असून या भजनी मंडळातील सर्व व्यक्ती माळकरी आहेत. आतापर्यंत त्यांना कोणत्याही संस्थेकडून भजनी साहित्य मिळाले नाही व त्यांचे जवळ स्वत:चे भजनी साहित्य नाही. 
तरी श्री गजानन महाराज संस्थानकडून नियमांनुसार भजनी साहित्य देण्यास काहीही हरकत नाही. किर्तनकार/भागवतकार

सही. --------------

(४) - सरपंच दाखला (पुन्हा भजनी साहित्य मिळणेबाबत) -

मौजे ग्रामपंचायत ----------------- येथून दाखल देण्यात येतो की, सदरहू भजनी मंडळ आमचे गांवचे रहिवाशी आहे. यापूर्वी आमच्या गांवातील एका भजनी मंडळास श्री गजानन महाराज संस्थान, शेगांव कडून भजनी साहित्य मिळाले आहे. परंतु या गांवची लोकसंख्या ५००० चे वर आहे. त्यामुळे सदरहू भजनी साहित्य अपुरे पडत आहे. करीता आलेल्या भजनी मंडळास सुध्दा आपले नियमानुसार भजनी साहित्य देण्यास काहीही हरकत नाही.
रिता हा दाखला देण्यात येत आहे.

सरपंच
सही/शिक्का

वरीलप्रमाणे नियम व संबंधित दाखल्यांचे पुर्तता झाल्यानंतर त्या दिंडीमधील वारकऱ्यांना भजनी साहित्य देण्यात येते. त्यामध्ये १० टाळजोळ, १ वीणा, १ मृदंग, १ हातोडी, टाळजोळ ठेवण्याकरिता कापडाची मजबुत पिशवी, वीणा खोळ, मृदंग खोळ व संत वाङमय इत्यादी साहित्याचा समावेश असतो. वरील साहित्य उत्सवाचे शेवटचे दिवशी दहीहांडीचा कार्यक्रम झाल्यानंतर संस्थेचे मा. विश्वस्त यांचे हस्ते वितरीत करण्यात येते.

२) आतापर्यंत झालेले भजनी साहित्याचे वितरण :

।। श्री गजानन महाराज समर्थ ।।
श्री गजानन महाराज संस्थान, शेगांव

(पब्लिक ट्रस्ट रजि. नं.ए-२५० बुल.)

राज्य निहाय एकूण भजनी साहित्य वितरण
             
        दि.31/03/2023
अ.क्र. राज्य श्री क्षेत्र शेगांव श्री क्षेत्र पंढरपूर श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर श्री क्षेत्र आळंदी एकूण
1 महाराष्ट्र 12610 3128 1949 602 18289
2 गोवा 0 2 0 0 2
3 कर्नाटक 2 630 0 4 636
4 गुजरात 6 0 161 0 167
5 मध्यप्रदेश 151 1 0 1 153
6 आंध्रप्रदेश 46 18 0 0 64
7 उत्तर प्रदेश 1 0 0 0 1
8 उत्तराखंड 1 0 0 0 1
9 तेलंगणा 7 16 0 0 23
  एकूण 12824 3795 2110 607 19336
 

जिल्हा निहाय एकूण भजनी साहित्य वितरण  (महाराष्ट्र)

             
अ.क्र. जिल्हा श्री क्षेत्र शेगांव श्री क्षेत्र पंढरपूर श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर श्री क्षेत्र आळंदी एकूण
1 बुलढाणा 2203 0   0 2203
2 अकोला 1714 0 0 0 1714
3 अमरावती 1347 0 0 0 1347
4 यवतमाळ 977 0 0 0 977
5 वर्धा 1097 0 0 0 1097
6 नागपूर 748 1 0 0 749
7 चंद्रपूर 301 0 0 0 301
8 गोंदिया 5 0 0 0 5
9 भंडारा 61 0 0 0 61
10 गडचिरोली 3 0 0 0 3
11 वाशिम 431 0 0 0 431
12 हिंगोली 375 1 0 0 376
13 नांदेड 422 113 0 11 546
14 परभणी 613 42 1 5 661
15 बीड 52 216 0 37 305
16 अहमदनगर 55 123 236 51 465
17 औरंगाबाद 438 37 11 11 497
18 जालना 615 10 0 2 627
19 जळगांव 853 0 5 0 858
20 धुळे 70 37 83 0 190
21 नंदुरबार 5 7 5 0 17
22 नाशिक 47 22 1161 0 1230
23 ठाणे 7 30 287 5 329
24 पालघर 2 3 107 70 182
25 मुंबई 12 19 2 0 33
26 पुणे 48 45 18 2 113
27 सातारा 2 240 1 246 489
28 सांगली 2 154 0 36 192
29 रायगड 0 99 30 5 134
30 रत्नागिरी 1 81 0 49 131
31 सिंधुदुर्ग 0 62 0 3 65
32 लातूर 76 525 2 38 641
33 उस्मानाबाद 10 342 0 21 373
34 सोलापूर 16 334 0 4 354
35 कोल्हापूर 2 585 0 6 593
  एकूण 12610 3128 1949 602 18289
             
             
जिल्हा निहाय एकूण भजनी साहित्य वितरण (गोवा)
अ.क्र. जिल्हा श्री क्षेत्र शेगांव श्री क्षेत्र पंढरपूर श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर श्री क्षेत्र आळंदी एकूण
1 पणजी  गोवा 0 2 0 0 2
  एकूण 0 2 0 0 2
जिल्हा निहाय एकूण भजनी साहित्य वितरण (कर्नाटक)
अ.क्र. जिल्हा श्री क्षेत्र शेगांव श्री क्षेत्र पंढरपूर श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर श्री क्षेत्र आळंदी एकूण
1 बागलकोट 0 129 0 0 129
2 बेळगांव 0 226 0 1 227
3 विजापूर 0 57 0 0 57
4 गदग 0 29 0 0 29
5 कोप्पल 0 3 0 0 3
6 शिमोगा 0 5 0 0 5
7 डावणगिरी 0 12 0 0 12
8 हवेली 0 16 0 0 16
9 धारवाड 0 46 0 1 47
10 चिकमंगरूळ 0 3 0 0 3
11 कारवार 0 4 0 0 4
12 बिल्लारी 0 9 0 0 9
13 तूमकर 0 2 0 0 2
14 ओव्हर 0 1 0 0 1
15 बिदर 2 74 0 2 78
16 कलबुर्गी 0 8 0 0 8
17 गुलबर्गा 0 5 0 0 5
18 चित्रदुर्ग 0 1 0 0 1
  एकूण 2 630 0 4 636
जिल्हा निहाय एकूण भजनी साहित्य वितरण (गुजरात)
अ.क्र. जिल्हा श्री क्षेत्र शेगांव श्री क्षेत्र पंढरपूर श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर श्री क्षेत्र आळंदी एकूण
1 सुरत 2 0 0 0 2
2 बलसाड 1 0 150 0 151
3 बडोदा 1 0 0 0 1
4 दांग गुजरात  1 0 7 0 8
4 निमाड गुजरात  1 0 0 0 1
5 नवसारी गुजरात  0 0 4 0 4
  एकूण 6 0 161 0 167
             
जिल्हा निहाय एकूण भजनी साहित्य वितरण (मध्यप्रदेश)
अ.क्र. जिल्हा श्री क्षेत्र शेगांव श्री क्षेत्र पंढरपूर श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर श्री क्षेत्र आळंदी एकूण
1 भोपाल 1 0 0 0 1
2 इंदौर 3 0 0 0 3
3 खण्डवा 27 0 0 0 27
4 बऱ्हाणपूर 49 1 0 0 50
5 बडवाणी 1 0 0 0 1
6 बैतूल 21 0 0 0 21
7 छिंदवाडा 49 0 0 1 50
  एकूण 151 1 0 1 153
जिल्हा निहाय एकूण भजनी साहित्य वितरण (आंध्र प्रदेश)
अ.क्र. जिल्हा श्री क्षेत्र शेगांव श्री क्षेत्र पंढरपूर श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर श्री क्षेत्र आळंदी एकूण
1 आदिलाबाद 41 6 0 0 47
2 निजामाबाद 5 11 0 0 16
3 मेडक 0 1 0 0 1
  एकूण 46 18 0 0 64
जिल्हा निहाय एकूण भजनी साहित्य वितरण (उत्तर प्रदेश)
अ.क्र. जिल्हा श्री क्षेत्र शेगांव श्री क्षेत्र पंढरपूर श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर श्री क्षेत्र आळंदी एकूण
1 जालौन 1 0 0 0 1
  एकूण 1 0 0 0 1
जिल्हा निहाय एकूण भजनी साहित्य वितरण (उत्तराखंड)
अ.क्र. जिल्हा श्री क्षेत्र शेगांव श्री क्षेत्र पंढरपूर श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर श्री क्षेत्र आळंदी एकूण
1 ऋषीकेश 1 0 0 0 1
  एकूण 1 0 0 0 1
जिल्हा निहाय एकूण भजनी साहित्य वितरण (तेलंगणा)
अ.क्र. जिल्हा श्री क्षेत्र शेगांव श्री क्षेत्र पंढरपूर श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर श्री क्षेत्र आळंदी एकूण
1 संगारेड्डी 0 11 0 0 11
2 निर्मळ 5 0 0 0 5
3 बानंद्रा 1 0 0 0 1
4  मेंडक 1 5 0 0 6
  एकूण 7 16 0 0 23
 

 

भेटवस्तू वितरण :-

उत्सवामध्ये येणाऱ्या सर्व वारकऱ्यांना संस्थेमार्फत श्रींच्या समाधिशताब्दी वर्षापासून (सन २०१०) भजनी साहित्यासोबतच भेटवस्तू सुध्दा देण्यात येते. भेटवस्तुंमध्ये दरवर्षी बदल करण्यात येत असतो. २०१० या वर्षामध्ये सर्व वारकऱ्यांना कापड प्रसाद, २०११ मध्ये पादत्राणे, २०१२ मध्ये सतरंजी वितरीत करण्यात आली. या व्यतिरिक्त दरवर्षी पुण्यतिथी उत्सवामध्ये आलेल्या सर्व वारकऱ्यांना बरसाती घोंगडी वितरित करण्यात येतात.

नियम :- भेटवस्तू ही सर्वसाधारणपणे वर्षामधून एकदा देण्यात येते.

अंशदान :-

उत्सवामध्ये सहभागी भजनी साहित्य मिळालेल्या भजनी दिंड्यांना भजनी साहित्य दुरुस्ती करिता अंशदान दिल्या जाते.

१) पायदळ दिंडीला :- ७०० रू.
२) मोटार दिंडीला :- ५०० रू.
३) २०० वारकरी संख्या असलेल्या दिंडीला :- १००० रू. 

प्रोत्साहनपर बक्षीस :-

प्रत्येक उत्सवामध्ये २१ भजनी दिंड्यांना प्रोत्साहनार्थ बक्षीस देण्यात येते. त्यामध्ये 
प्रथम बक्षीस :- २००१ रू. 
व्दितीय बक्षीस :- १५०१ रू.
तृतीय बक्षीस :- १२०१ रू.

१) उत्सवामध्ये सहभागी भजनी दिंड्यांपैकी साज, वेभूषा याबाबतीत उत्कृष्ट ठरलेल्या भजनी दिंडीस प्रथम क्रमांकाचे २००१ रू. प्रोत्साहनार्थ बक्षीस देण्यात येते.
२) तसेच उत्कृष्ट हरिपाठ,१ भजन सादर करणाऱ्या भजनी दिंडीस व्दितीय क्रमांकाचे १५०१ रू. प्रोत्साहनार्थ बक्षीस देण्यात येते.
३) तसेच उत्कृष्ट पाऊल्या (वैष्णवीनर्तन) सादर करणाऱ्या भजनी दिंडीस तृतीय क्रमांकाचे १२०१ रू. प्रोत्साहनार्थ बक्षीस देण्यात येते.