![]() |
|||||
![]() |
|||||
.................................................................................................................................................................................................................................................. आध्यात्मिक क्षेत्रातील कार्यामध्ये खालील सेवाकार्य अंतर्भुत आहे.
श्रींचा पालखी सोहळा
संपूर्ण महाराष्ट्रामधून श्री क्षेत्र पंढरपूरला बहूतेक सर्व
संतांच्या पालख्या दिंडीसह नेण्याची परंपरा आहे. भक्त आणि भाविकांना तीर्थयात्रा
घडाव्यात आणि वारकरी सांप्रदायाच्या महान परंपरेची
जपणूक व्हावी या उद्देशाने
श्री गजानन महाराज संस्थानने १९६८ पासून श्री क्षेत्र पंढरपूरला पायी वारी व श्री क्षेत्र आळंदीला
मोटारीने पालखी दिंडीसह नेण्याचा अभिनव उपक्रम सुरू केलेला आहे. याशिवाय श्री
क्षेत्र त्र्यंबकेश्वर, श्री क्षेत्र पैठण, श्री क्षेत्र मुक्ताईनगर या ठिकाणी
देखील संस्थानची वारी निमित्त पालखी जात आहे. आषाढी
प्रवासात असणाया सोई :- श्रींचे पालखी सोबत प्रवास करताना वारकऱ्यांची दुपारी व रात्री भोजन प्रसादाची व्यवस्था केली जाते. त्याचप्रमाणे वाटेने चहापाणी व फराळाची व्यवस्था सुध्दा श्रींच्या भक्तांकडून केल्या जाते. रात्रीचे मुक्कामी निवासाची व्यवस्था धर्मशाळा, मंगलकार्यालय व शाळा यामध्ये केलेली असते. सकाळी स्नानाकरिता पाण्याची व्यवस्था असते. काही ठिकाणी भक्त आपआपल्या परिने वारकरी मंडळीची सेवार्थ व्यवस्था करतात. वाटेत भेटणाया वारकरी दिंड्यांची सेवा :-
श्री क्षेत्र पंढरपूर आषाढी वारीसाठी इतरही भजनी
दिंड्या पायी जात असतात. वाटेने भेटणाया
दिंड्यातील पुरुष-महिला, मुले-मुली इत्यादी वारकयांना संस्थानकडून कपडे वितरित करण्यात येतात. तसेच प्रत्येक
दिंडीतील प्रमुख, चोपदार, वीणेकरी यांचा कापड प्रसादासह सत्कार करण्यात येतो. |
|||||
![]() |