संस्थानचे विविध क्षेत्रातील सेवाकार्य

..................................................................................................................................................................................................................................................

शैक्षणिक कार्य

सरस्वतीचा वरदहस्त लाभल्यावर मानवाचा उद्धार होतो हे लक्षात घेऊन संस्थानने अनेक उपक्रम राबविले आहेत. सुशिक्षीत तसेच संस्कारक्षम पिढी घडविण्यासाठी संस्थानव्दारा संचालीत शैक्षणिक केंद्र कार्यरत आहे.

अभियांत्रिकी महाविद्यालय

इंग्रजी माध्यम शाळा

आर्थिक दृष्टया कमकुवत वर्गाकरीता शैक्षणिक मदत

श्री गजानन महाराज माध्यमिक व उच्च माध्यमिक इंग्लिश विद्यालय ( इंग्रजी माध्यम शाळा )

शहरातील विद्याथ्र्यांच्या तोडीने ग्रामीण भागातील सर्वसाधारण परिस्थितीतील विद्याथ्र्यांनी शैक्षणिक प्रगती करावी ह्या उद्दीष्टाने संस्थानच्या अधिपत्याखाली श्री गजानन शिक्षण संस्थेनी दि. ०१ जुलै १९८६ रोजी नर्सरी ते बारावीपर्यंत इंग्रजी माध्यमातील शैक्षणिक सेवा शेगांव येथे सुरू केली. या संस्थेमध्ये एकूण विद्यार्थी २९५९ शिक्षण घेत आहेत. आधुनिक शैक्षणिक तंत्रज्ञानाचा वापर करून विद्याल्यातील विद्याथ्र्यांना या स्पर्धेच्या युगात सक्षम बनवित १० व १२ वी. च्या उत्कृष्ट निकालीची परंपरा विद्यालयाने कायम राखली आहे. 
दरवर्षी विद्यालयातून MTSNTS परिक्षांचे मार्गदर्शन केले जाते. त्यापैकी इयत्ता ८ वी, ९ वी व १० वी चे विद्यार्थी परीक्षेस बसले होते. त्यामधून ३५ विद्याथ्र्यांची MTS मेरीट मध्ये निवड झाली व या परिक्षेतून कु. निधीशा संजय बजाज या विद्यार्थींने महाराष्ट्रातून प्रथम येण्याचा मान मिळवीला. 

दरवर्षी प्रमाणे याहीवर्षी इयत्ता ४ थी व ७ वी. च्या स्कॉलरशीप परिक्षेत विद्याथ्र्यांनी घवघवीत यश संपादन केले आणि इयत्ता ७ वी मधून ९ विद्यार्थी व इयत्ता ४ थी मधून १२ विद्यार्थी शिष्यवृत्तीस पात्र ठरले. विद्यालयामधून चित्रकला, रेखाकला यांच्या इंटरमिजिएट व ऐलीमेंटरी परिक्षा घेतल्या जातात. NTSE व सायन्स ऑलिम्पियाड फाऊंडेशन तर्फे घेण्यात आलेल्या सर्व सायबर, मॅथस, सायन्स व इंग्लिश, ऑलिम्पियाड परिक्षा शाळेमधून घेतल्या जातात व त्यास बरेचसे विद्यार्थी IInd Level Exam. करीता निवडल्या जातात. विद्यालयामध्ये इतर उपक्रमांसोबत विविध सामाजिक, शैक्षणिक उपक्रम राबविले जातात. वर्षभराच्या स्पर्धामध्ये वादविवाद, भाषणस्पर्धा, समुहगीत, नृत्यस्पर्धा, देशभक्तीपर गीत, भजन स्पर्धा, इत्यादी स्पर्धाचे आयोजन केले जाते. 

त्याचप्रमाणे शाळेतील विद्यार्थी क्रिडा स्पर्धेमध्येही मागे नाहीत. तालुकास्तरीय जिल्हास्तरीय व राज्यस्तरीय क्रिडास्पर्धांमध्ये विद्यार्थी चांगले यश संपादन करीत आहेत.

वर्गाची वैशिष्ट्ये (हायलाईट्स):-
१. उच्चशिक्षित व अनुभवी शिक्षकवृंद
२. उच्च दर्जाचे अभ्यास साहित्य
३. नियोजित वर्ग खोल्या
४. घटक चाचण्या, सत्रांत परीक्षा व अंतिम परीक्षा यांचे वैशिष्टपूर्ण नियोजन.
५. वर्षाच्या जुलै महिन्यात अभ्यासक्र सत्राला सुरुवात.
६. ११ वी व १२ वी चा अभ्यासक्रम नियोजनपूर्वक पूर्ण करणे.


दृष्टिक्षेप :-

१) विद्याथ्र्यांच्या अष्टपैलू व्यक्तिमत्वाचा विकास करणे.
२) भविष्याचे समर्थ नागरिक घडवण्यासाठी शिक्षणातून विद्यार्थीचा वैज्ञानिक  दृष्टिकोनातून विकास करणे.
३) एकविसाव्या शतकात असूनही भारतीय संस्कृतीप्रमाणे विद्यार्थीमधील आध्यात्मिक व नैतिक गुणांचा विकास करणे.
४) आजच्या स्पर्धात्मक युगात टिकण्यासाठी विद्यार्थीमधिल उणीवांवर मात करता येईल असे व्यक्तिमत्त्व घडविणे.

ध्येय :-

१) विद्याथ्र्यांच्या उत्कृष्ट गुणवत्ता वाढीसाठी अध्यापनात आधुनिक शिक्षण पध्दतीचा वापर करणे.

२) विद्यार्थीमधिल सुप्त गुणांना वाव देण्यासाठी शैक्षणिक वातावरण तयार करणे.

३) समाजातील सर्व घटकांतून आलेल्या विद्यार्थीना स्पर्धापरिक्षेसाठी सक्षम बनविणे.

४) विद्यार्थीमध्ये ‘जनसेवा हिच ईश्वरसेवा‘ या वृत्तीचा भाव निर्माण करणे.

शाळा व्यवस्थापण समिती :-

आदरणीय श्री. निळकंठ पाटील - अध्यक्ष

आदरणीय श्री. रामकृष्ण पाटील - उपाध्यक्ष
मा. श्री. प्रशांत बानोले - सदस्य

मा . श्री . शुभम मुरारका - सदस्य
मा. कु. कविताताई पाटील - प्राचार्या

इमारत :-

शाळेचा परिसर हा आठ एकरांमध्ये विस्तारित आहे. श्री गजानन महाराज अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या उजव्या बाजूला या विद्यालयाचा परिसर आहे. पर्यावरणाचा दृष्टीकोन समोर ठेवून गोलाकार अशी तीन मजली सुसज्ज इमारत असून त्यामध्ये वर्गाचा एकमेकांना त्रास होणार नाही याची विशेष दक्षता घेतलेली आहे.

शाळेच्या परिसरामध्ये विविध प्रकारची झाडे लावलेली असून त्यामुळे पर्यावणाचा समतोल राखण्यास मदत होते.

शिक्षकवृंद :-

विद्यालयातील शिक्षक वृंद उच्च गुणवत्ता धारण केलेले व अनुभवी आहेत. सर्व शिक्षक विद्यार्थीच्या समस्यांचे निराकरण करण्यास उत्साही असतात.

अभ्यासक्रम

सर्वसामान्य गट

१. इंग्रजी १०० गुण
२. भौतिकशास्त्र १०० गुण
३. रसायनशास्त्र १०० गुण
४. जीवशास्त्र १०० गुण
५. गणित १०० गुण
६. माहिती तंत्रज्ञान १०० गुण
७. पर्यावरणशास्त्र १०० गुण

इतर सुविधा

स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र

संस्थेमध्ये स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र उपलब्ध आहे. ज्यामध्ये विद्याथ्र्यांना PMT/PET/AIEEE/AIPMT/NDA/AFMC इत्यादीसारख्या परिक्षेबाबत मार्गदर्शन केले जाते.
MHT-CET चा अभ्यासक्रम परीक्षामंडळाप्रमाणे तयार केलेला असून त्यामध्ये विषयाचे सखोल ज्ञान व विद्याथ्र्यांची मानसिकता यांवर विशेष लक्ष दिले जाते.
विद्याथ्र्यांना स्पर्धापरीक्षेमध्ये अधिकाअधिक गुण कसे मिळवता येईल यासाठी त्यांचेकडून विशीष्ट प्रकारची तयारी करुन घेणे.

नियम व अटी :-

१. सर्व विद्याथ्र्यांनी महाविद्यालयातील शिस्तीचा भंग करू नये व दिलेल्या सर्व नियमांचे पालन करावे
२. शिक्षण संस्थेला हानी पोहचेल असे कोणत्याही प्रकारचे गैरवर्तन विद्याथ्र्यांनी करु नये.
३. विद्याथ्र्यांनी स्वच्छ व नीटनेटका गणवेश परिधान करावा व ओळखपत्र जवळ असणे अनिवार्य राहील.
४. विद्यालयात तासिकेच्या वेळेत विद्याथ्र्यांनी बाहेर राहू नये.
५. विद्यालयाच्या परिसरामध्ये विद्याथ्र्यांना मोबाईल वापरण्यास प्रतिबंध आहे. आढळल्यास जप्त करण्यात येईल.
६. विद्यालयातील टेबल, खुच्र्या, प्रयोगशाळा उपकरणे, वाचनालयातील पुस्तके, खिडकीच्या काचा व विद्यूत उपकरणे याला नुकसान होणार नाही यांची दक्षता घ्यावी.
७. विद्याथ्र्यांनी शिक्षकवृंदाशी सभ्यतेने वागणूक करावी.
८. विद्याथ्र्यांनी अतिरिक्त शिकवणी वर्ग व सीईटी तासिकेला आपल्या गणवेशातच यावे.
९. विद्यालयातील होणाऱ्या समारंभामध्ये विद्याथ्र्यांनी शांतता राखावी.


पालक-शिक्षक परिषद :-

विद्यालयातील प्राचार्यांच्या अध्यक्षेतेखाली दरवर्षी दोनवेळा पालक-शिक्षक परिषदेचे आयोजन करण्यात येते. यामध्ये विद्याथ्र्यांच्या समस्या, त्यांची प्रगती व विद्याथ्र्यांचा सर्वांगीण विकास व वर्षभरामध्ये राबवण्याचे उपक्रम यांवर चर्चा केली जाते.

पालकांना विनंती :-

१. पालकांनी विद्यार्थीची वैयक्तिक स्वच्छता त्यांचा गणवेश, दैनंदिन उपस्थिती व विद्यालयातील वर्तणूक यांचेकडे लक्ष द्यावे.
२. पालकांनी विद्यार्थीचा घटक चाचणी सत्र परीक्षा यांचा निकालाचे स्वत: निरीक्षण करावे व विद्यालयात होणाऱ्या चर्चासत्रात सहभाग घ्यावा.
३. पालकांनी त्यांच्या पाल्यांचा नेहमी गृहपाठ घ्यावा.

वाचनालय :-

विद्यालयाच्या इमारतीमध्ये पहिल्या मजल्यावर वाचनालय आहे. त्यामध्ये आवश्यक वेगवेगळ्या प्रकारची पुस्तके आहेत. स्पर्धापरीक्षेसंबंधीची विविध प्रकाशनाची पुस्तके आहेत. तसेच विद्याथ्र्यांना अभ्यासासाठी पुरक वातावरण आहे.

प्रयोगशाळा :-

भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र या विषयाच्या आधुनिक उपकरणांनी युक्त व सुसज्ज प्रयोगशाळा आहे. या सर्व प्रयोगशाळा विद्यालयाच्या परिसरात आहे.

माहिती तंत्रज्ञान विभाग :-

या विभागामध्ये ६० संगणक संच असून त्या संलग्न सर्व प्रकारची उपकरणे आहेत. तसेच माहिती तंत्रज्ञानाच्या प्रयोगशाळेमध्ये हायस्पीड इंटरनेटची सुविधा आहे.

महाविद्यालयीन उपक्रम :-

जीवशास्त्रीय अभ्यास दौरा.

महाविद्यालयामध्ये दरवर्षी शैक्षणिक वर्षात ऑगस्ट महिन्यात जीवशास्त्रीय अभ्यासदौऱ्याचे आयोजन केले जाते.

अभ्यास दौऱ्याचे फायदे -

१. प्रात्यक्षिकरित्या विद्याथ्र्यांना नैसर्गिक सौंदर्यांचे महत्त्व कळावे.
२. जंगले आणि जल संवर्धन याबद्ल विद्याथ्र्यांना माहिती व्हावी.
३. सिल्वर फर्न यासारख्या वनस्पती डोंगराळ भागामध्येच आढळतात त्यांची माहिती व्हावी.
४. डोंगराळ भागातील जमिनीची माहिती मिळावी.
५. औषधी वनस्पतीबद्दल विद्याथ्र्यांना माहिती व्हावी.

परिसराबद्दल

१. आठ एकराचा रमणीय परिसर                                                                                               २. भव्य इमारत
३. संग्रहालय                                                                                                                ४. २४ तास विद्युत व पाणी पुरवठा
५. स्वंतत्र सुरक्षा व्यवस्था.

श्री गजानन महाराज शिक्षण संस्था द्वारा संचालित
श्री गजानन महाराज उच्च माध्यमिक इंग्लिश विद्यालय,
शेगांव -४४४२०३,जि.बुलडाणा (महाराष्ट्र.)
दुरध्वनी :-  ०८६६९६३८०८८