शेगांवचा इतिहास

श्रींचे समाधी मंदिराचे स्थान

प्राचिन काळी श्रृंगमुनींनी वसविल्यामुळे श्रृंगगाव हे नाव पडलेल्या या गावास पुढे शेगांव म्हणून ओळखले जाऊ लागले. येथील सुप्रसिध्द शिवमंदिरामुळे या गावास शिवगांव असेही म्हणत. या शिवगांवाचे पुढे शेगांव असे नामकरण झाले. शेगांव या गावाच्या जन्मकथेबद्दल विविध मते असली तरीही आज मात्र हे ओळखले जा े परब्रह्.मस्वरूप संतश्रेष्ठ श्री गजानन महाराज यांच्या पावन वास्तव्यामुळे. महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्ह्यातील शेगांव या खेडेगावात श्रींच्या पदस्पर्शाने तसेच त्यांच्या संजीवन वास्तव्यामुळे समृद्धीची गंगा, भावभक्तिची यमुना व ज्ञानरूपी सरस्वती सतत वाहत आहेत.