श्री क्षेत्र शेगांव व श्रींचे समाधी मंदिराचे स्थान

शेगांव हे महाराष्ट्रातील बुलडाणा जिल्ह्यातील तिर्थक्षेत्र मध्य रेल्वेच्या मुंबई-नागपुर मार्गावर ‘ब‘ वर्गाचे स्टेशन आहे. ओखापूरी, तेरणा आणि डिलक्स(ज्ञानेश्वरी) इत्यादींसारख्या काही अतिजलद लांब पल्याच्या गाड्या वगळता इतर सर्व रेल्वे गाड्या येथे थांबतात. तसेच शेगांवपासून ५ तासांच्या अंतरावर नागपूर व औरंगाबाद ही विमानतळे आहेत. रेल्वे स्टेशन परिसरातच संस्थानचे चौकशी कक्ष असून भक्तांना योग्य मार्गदर्शन मिळू शकते. स्टेशन परिसरात संस्थानच्या सेवार्थ बसेस उपलब्ध असतात. स्टेशन पासून मंदिराचे अंतर अवघे ५ फर्लांगाचे असून केवळ दहा मिनिटांचाच हा पायदळ रस्ता आहे. मंदिराच्या रस्त्यानेच एस.टी.स्टॅन्ड आहे. तसेच दक्षिणेस शेगांवपासून १६ कि. मी.अंतरावर राष्ट्रीय महामार्ग क्र. ६ आहे. संतनगरी शेगांव हे अंतर्राज्य परिवहन मंडळाच्या गुजरात व मध्यप्रदेश या प्रांतांशी बसेस व्दारा जोडलेले आहे. तसेच महाराष्ट्रातील बहुसंख्य नगरे व तीर्थस्थाने बसेसने शेगांवशी जोडली गेलेली आहेत.