मान्यवरांच्या भेटी व अभिप्राय

प्रत्येकामध्ये तापसाच्या मिलनासाठी आसुसलेला राजस असतो. श्री शिवशंकरभांऊच्या पहिल्या भेटीतंच मला त्यांच्यामध्ये तो दिसला. संकल्पाचं सतत स्मरण म्हणजे जप. असा जप करतांना ते मला दिसले. संकल्प आणि सिध्दी यातील अंतर कापणारी तळमळीची कैची मला त्यांच्या हातात दिसली.
मध्यमवर्गीय, शेतकरी, भूमिहीन, यांच्या भक्तिचं हे संस्थान माहेरघर आहे. माहेरवासियांसारखं आपलं गा-हाण देवाजवळ मांडण्यासाठी येणारे हजारो भक्त मी येथे पाहिलेत. देवळाच्या परिसरांत स्वच्छता पाहिली. जगातील पंचतारांकीत धर्मस्थळांमध्ये जो झगमगाट आहे तो येथे मला दिसला नाही म्हणून माझ्यावर त्याचा जास्त परिणाम झाला. धर्मस्थळाच्या भक्तिचं थेटर होवू नये म्हणून श्री. भाऊ, व्यवस्थापक मंडळ व विश्वस्त दखल घेतांना आढळले. 

बाबा आमटे
थोर समाजसेवक व आनंदवनचे प्रणेते.

.........................................................................................................................................................................................

"Education Is 
The Manifestation Of Perfection, 
Which Is Already In Man''

To Be Aim Is 
The Greatest Manifestation of Power 

आदरणीय 
श्री. तुकारामदादा गिताचार्य

.........................................................................................................................................................................................

I have been greatly impressed by what I saw on to this campus. Here I see a technological institution being founded on a spiritual base with a far reaching vision of the future. I am sure that this college will grow into an university, in the true sense of the word. Where 'Universal' man will be developed.

Dr. Vijay P. Bhatkar,
(Executive Director Center for Development of Ad)

.........................................................................................................................................................................................

श्री राम
सन्त गजानन कृपा से यह सुन्दर कालेज ।। शिक्षा के संग धर्म की देता है नॉलेज ।।।

- आचार्य राजेश रामायणीश्रीगजानन महाराजांच्या तपोभूमीजवळंच आपली ज्ञानभूमी विराजित झालेली पाहून मन प्रमुदित झाले. सर्व वास्तू आणि वातावरण नम्र आणि संस्कार श्रीमंतीने उजळलेले जाणवले. माननीय विश्वस्त आणि मा. प्राचार्य व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांच्या विद्याभिलाषी प्रांजळी मी मन:पूर्वक सुयश चिंतून त्यांच्या अथक श्रमभूमीला अभिवादन करतो. 

श्री दाजी पणशीकर,
संत आध्यात्मिक साहित्याचे गाढे अभ्यासक..........................................................................................................................................................................................

संस्थान की उत्तरोत्तर प्रगति देखकर अत्यंत हार्दिक प्रसन्नता का अनुभव हो रहा है।। धार्मिक आस्था की निधी के सदुपयोग का सबसे अच्छा उदाहरण इस ट्रस्ट को देखकर लगता है।

आदरणीय श्री एम. एम. मालवीय, 
पंजाबी बाग, भोपाल, मध्य प्रदेश

.........................................................................................................................................................................................

अध्यात्मिक पुन:निर्माण का यह केंद्र बन रहा है। यहॉ आकर बहुत ही अच्छा लगा। यहॉ आत्मा की पृष्ठी होती है । यह अन्य परम्परा को भी पुन:र्जिवित करने का केंद्र बनेगा ।

आदरणीय श्री राजेंद्रसिंह ,
अध्यक्ष, राष्ट्रीय जलबिरादरी,.........................................................................................................................................................................................

It gives me much pleasure to be able to visit this beautiful institution. The most outstanding charecteristic of it is its simplicity in appearence. Through at located in an abandoned godown, the Engineering College is fully equipped for the best kind of teaching, running with wonderful efficiency and showing brilliant results obtained by the students. That has been possible because of the spirit of dedication that can be found in the teachers and the management. Probably it is because of its association with Shri Sant Gajanan Maharaj Sansthan. 
I pray to God that the Institution may grow from strength to strength and fulfil the requirement of the whole area.

Swami Bhuteshananad,
President, Shri Ramkrishna Mission 

.........................................................................................................................................................................................

श्री संत गजानन महाराज कॉलेज ऑफ इंजिनियरिंग बघण्याचा योग आला. कॉम्प्यूंटर विभागासहित सर्व विभाग दाखविले. फार चांगली व्यवस्था आहे व सर्व विभागात उत्तम शिक्षण मिळेल, विद्यार्थी तज्ज्ञ होतील असा सर्वांचा प्रयत्न आहे हे पाहून आनन्द झाला. श्री स्वामी विवेकानन्द विद्यार्थी वसतिगृहही नविन झाले आहे. सर्व सोयींनी युक्त अशी ही इमारत आहे. श्री संत गजानन महाराजांचे कृपाक्षत्राखाली चाललेले हे कॉलेज उत्तम प्रगति करील हा विश्वास आहे.

म. द. देवरस, माजी सरसंघचालक, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ