शंका समाधान 

वारंवार विचारण्यात येणारे प्रश्न (शंका समाधान )

१. श्रींचे मंदिर उघडण्याची व मंदिर बंद होण्याची वेळ कशी आहे ?
श्रींचे मंदिर सकाळी ५ वाजता उघडते व रात्री ९.३० वाजता शेजारती नंतर दर्शनबारीमध्ये् भक्त असे पर्यंत मंदिर सुरू असते व नंतर मंदिर बंद करण्यात येते. 

२. श्रींकरीता सोबत आणलेले देववस्त्र, विविध पूजा साहित्य, नैवेद्य कोठे द्यावे लागेल ?
श्रींचे दर्शनाकरीता जात असतांना सोबत आणलेले पूजा साहित्य दर्शनबारीमध्ये एक स्वतंत्र विभाग आहे, त्या ठिकाणी नोंद करून जमा करण्याची व्यवस्था केलेली आहे.

३. श्री महाप्रसादाची वेळ किती आहे ?
महाप्रसाद भक्तांना दररोज सकाळी १०.०० ते
सायं.९ पर्यंत संस्थान तर्फे विनामूल्य वितरीत करण्यात येतो. महाप्रसादाची वेळ सकाळी १०.०० ते सायं.९ पर्यंत असली तरी प्रतिक्षालयातील शेवटचा भक्त असेपर्यंत महाप्रसाद वितरण सुरु असते.

४. अभिषेक करण्याकरिता काय पध्दत आहे व वेळ किती आहे ?
अभिषेकाची वेळ सकाळी ५:३० ते ८:०० अशी आहे. देणगी काउंटरवर अभिषेकाकरिता देणगी पावती घेवुन या वेळात आपल्याला अभिषेक करता येईल.

. भक्तनिवास करिता खोलीची नोंदणी कोठे करावी लागते ?
भक्तनिवास करीता खोलीची नोंदणी त्या त्या भक्तनिवास काउंटरवर करता येईल.


८. श्रींचे पालखीचे दर्शन घ्यावयाचे असल्यास कसे घेता येईल ?
गुरूवार, दशमीला तसेच उत्सवाप्रसंगी श्रींच्या पालखीची परिक्रमा संपन्न होते. त्यावेळी आपणाला पालखीचे दर्शन घेता येईल. 

. श्रींचे मंदिरात असणारे दैनंदिन (नैमित्तिक) कार्यक्रम कसे आहेत ?
आपण दैनंदिन कार्यक्रम या ठिकाणी बटण प्रेस करून पाहु शकता

१०. वाङ्मय विभागात वितरणासाठी संस्थेचे उपलब्ध वाङमय कोणते ?
आपण वाङ्मय ह्या ठिकाणी बटण प्रेस करून पाहू शकता..