देणगी विभाग :

e-donation


२४ तास कार्यरत असणाऱ्या याा विभागात भक्तांमार्फत स्वेच्छेने दिली जाणारी देणगी स्विकारली जाते. देणगीदारांना संस्थानतर्फे देणगीचा एक दशांश भाग प्रसादरूपाने परत दिला जातो. ह्या प्रसादात लाडू, शाल, उपरणे किंवा/ व ब्लाऊज पीस, साडी, कपडे यांचा समावेश असतो. दानपेटीमध्ये प्राप्त झालेल्या सोने, चांदी वस्तुच्या पादुका तयार करून भक्तांना प्रसादरूपाने दिल्या जातात. संस्थेस येणारी देणगी आयकर अधिनियम १९६१  कलम ८० जी अन्वेय कर सवलतीस पात्र आहे . चेक, ड्राफ्ट व स्वाईप द्वारे देणगी स्विकारल्या जाते. देणगी म्हणून आलेल्या वस्त्रांची व कोणत्याही वस्तुची विक्री किंवा लिलाव केला जात नाही.

श्रींच्या मंदिरात भक्तांना स्वेच्छेने दान अर्पण करण्यासाठी दानपेटी, हुंडी ठेवलेली असते. भक्तगण आप-आपल्या संकल्पानुसार यामध्ये दान अर्पण करतात. आठवड्यातून दोन वेळा (सोमवार,शुक्रवार) संस्थानचे विश्वस्त, दर्शनाकरीता बाहेरगांवाहून आलेल्या भक्तांपैकी २ भक्त तसेच सेवाधारी मंडळी यांचे समक्ष दानपेटीवर लावलेले सील काढून उघडण्यात येतात.

दानपेटीतील नोटा, नाणी, मौल्यवान वस्तू वेगवेगळ्या करून नोटांचे मुल्यानुसार पॅकेट -गड्डी तयार करण्यांत येतात व आधुनिक पद्धतीने काऊंटीग मशिनवर नोटांची मोजदाद होते व क्रमवारीनुसार लावले जातात.

सुटी नाणी मशिनमधून वेगवेगळी करून त्या नाण्यांची मशिनव्दारे मोजदाद करून २००० रू चे या प्रमाणे पॅकेट तयार करुन पारदर्शक पिशवीत भरतात.

दानपेटीमध्ये येणाऱ्या सोने, चांदीच्या वस्तुंचे वजन करून दानपेटी रजिस्टरला नोंद केली जाते व त्यावर विश्वस्त, भक्त सेवाधारियांची स्वाक्षरी घेतली जाते. या नंतर आलेला तपशिल तसेच रोजच्या देणगीचा तपशील सर्व भक्तांना माहिती व्हावा म्हणून मंदिरातील फलकावर लावण्यात येतो.