विभाग

प्रशासकीय इमारत

   
  

मनिऑर्डर व टपाल विभाग

 दररोज पोस्टाद्वारे मनिऑर्डर्स येतात. मनिऑर्डरची संगणकाव्दारे नोंद केली जाते. तसेच भक्तांनी जसे सुचविले असेल त्या प्रमाणे देणगी त्या खात्यात घेतली जाते जसे देणगी/ अभिषेक/शिक्षण/धर्मार्थ दवाखाना इत्यादी. भक्ताने सुचविल्याप्रमाणे वाङ्मय, श्रींचा फोटो, अंगारा, प्रसादासहीत फ्रँकिंग मशिनद्वारे पोष्टाचे दरानुसार तिकीट लावून पाठविले जाते. 
 ५०० रुपये पासून पुढील देणगीस संस्थेचे नियमानुसार प्रसादरुपाने (कापडप्रसाद) भेट म्हणून पाठवले जाते. 

 चेक/डि.डी./इ.एम.ओ व्दारे सुध्दा दररोज भक्तांकडून देणगी पाठविल्या जाते. त्यांची देणगी पावती ही आयकर कायदयातून सुट मिळण्याकरीता ८० जी स्टँम्पसह तसेच प्रसादासह पार्सलने पाठविली जाते. ५०० रू. रक्कमेपासून पुढच्या रक्कमेच्या पावतीवर ८० जी स्टँम्प देण्यात येतो.
 देणगी देते वेळी भक्तांच्या नावाची नोंद देणगी विभागात केली जाते. ५०० रुपये पासून पूढील देणगी असलेल्यास व व्यवस्थित पूर्ण पत्ता असलेल्या भक्तांची संगणकात नोंद केल्या जाते. त्यांना श्रींच्या उत्सवाची निमंत्रण पत्रिका दरवर्षी पाठवल्या जाते. ज्या भक्तांच्या निमंत्रण पत्रिका परत आल्या त्यांची नोंद रद्द केली जाते. तसेच फोन वरुन आलेल्या तक्रारी किंवा अडचणीचे समाधानकारक माहिती देवून उत्तर दिले जाते. 

 

पाणी पुरवठा विभाग

पाणी पुरवठा विभागामार्फत संस्थानच्या आवारात बांधलेल्या पाण्याची टाकीव्दारे दर्शनार्थ येणाऱ्या भक्तांसाठी पाणी पुरवठ्याची तसेच गरम पाण्याची सोयही उपलब्ध केली जाते. संस्थानतर्फे मन नदीवर उभारलेल्या जलसंधारण केंद्राच्या साहाय्याने ९ कि.मी. अंतरावरून पाईपलाईनव्दारे पाणी आणून शेगांवातील टंचाईग्रस्त भागास टँकरव्दारे पाणीपुरवठा केला जातो. पाणी पुरवठा विभागाव्दारे गावातील लोकांनाही पिण्याचे पाणी उपलब्ध करून दिले जाते तसेच या विभागातर्फे गाई-गुरांसाठी पाण्याचा हौद बांधला असून येथील रोपवाटिकेव्दारे विविध प्रजातींच्या झाडांची रोपे विकसीत केली जातात तसेच त्यांचेनियमानुसार वितरणही केले जाते.

 

वाचनालय : -

श्री गजानन महाराज संस्थान व्दारा संचालित वाचनालय १९७५ साली सुरू झाले. वाचनालयामध्ये सुमारे ६५०० विविध विषयावरील ग्रंथसंपदा उपलब्ध आहे. त्यामध्ये ग्रंथ, ऐतिहासिक वाङ्मय, संदर्भग्रंथ, धार्मिक व संस्कारक्षम पुस्तके यांचा समावेश आहे. त्याशिवाय मराठी, हिंदी, उर्दू व इंग्रजी भाषेतील २६ हून अधिक प्रकारचे दैनिके वाचनालयात वाचण्यास उपलब्ध असतात. येथील शांत वातावरणात वृत्तपत्रे वाचन तसेच जिज्ञासूंना संदर्भग्रंथाचे वाचन करता येते. श्रावण मास व अधिक मास या महिन्यामध्ये धार्मिक ग्रंथाचे वाचक वर्ग घरोघरी सामूहिक वाचन करतात. 

मोटार वाहन विभाग :

संस्थानचा स्वत:चा मोटर वाहन विभाग असून या विभागात  लक्झरी बसेस, ट्रक्, अ‍ॅम्बुलन्स, ट्रॅक्टर, कार, टिप्पर, कार्गो, अ‍ॅटो, मिनीडोअर,  जेसीबी, रोलर , पिकअप अशी एकून १०० तीन व चार चाकी वाहने असून त्यांचा संस्थानच्या सर्व उपक्रमांमध्ये वापर केला जातो. शेगांव परिसरातील भुस्कूटी मळा परिक्षेत्रात ट्रक्स व बसेसच्या बॉडी बनवल्या जातात. हा विभाग संस्थानच्या खातेनिहाय कामाअंतर्गत असल्याने ही वाहने भाडे वाहत नाहीत. संस्थानचा स्वतंत्र डीझेल पंप आहे.
 
   

पार्कींग :

मंदिरजवळील भक्तनिवास परिसरात (हत्तिखाना) तसेच विसावा व आनंदविहार येथे भक्तांसाठी सायकल/मोटारसायकल स्टँडची, चारचाकी वाहनांच्या पार्कींगची व्यवस्था करण्यात आली आहे.

 

  

सेवार्थ बससेवा :

भक्तनिवास संकुल-२ (टिनशेड परिसर) येथून दर्शनार्थी भक्तांच्या सोयीसाठी संस्थानव्दारा बस स्टँड, रेल्वे स्टेशन, तसेच आनंदविहार, विसावा येथे जाण्या-येण्यासाठी बसची विनामुल्य व्यवस्था आहे.बस स्टँड, रेल्वे स्टेशन या मार्गावर १२ बसेस दिवस रात्र सेवार्थ चालतात. श्रींचे भक्ताजवळ स्वत:चे वाहन नसल्यास भक्तनिवास संकुल- २ (टिनशेड) परिसरातून आनंदविहार व विसावा येथे जाणे-येणे करिता संस्थानच्या ४ मिनीबसेस सेवार्थ आहेत

गौरक्षण विभाग :-

या विभागामार्फत दुष्काळग्रस्त भागातील गुरांना व गायींना चारा मिळावा या उद्देशानेश्री गजानन महाराज संस्थानने हा प्रकल्प सुरू केला आहे. बुलडाणा, अकोला, अमरावती व वाशिम अशा चार जिल्हयातील गरजु निवडक गौरक्षणला दरवर्षी नियमीतपणे चाऱ्याच्या स्वरूपात किंवा चारा खरेदीकरीता सहयोग निधी म्हणून मदत देण्यात येते.

 

साफसफाई विभाग

‘स्वच्छता तेथे पावित्र्य‘ तसेच ‘स्वच्छता ज्याचे घरी, आरोग्य तेथे वास करी‘ या उक्ती नुसार संस्थानने स्वच्छतेवर प्राधान्याने लक्ष दिले आहे. या विभागामार्फत संपूर्ण मंदिर परिसर तसेच सर्व विभागांची स्वच्छता सांभाळल्या जाते.

 

प्रसाद पुडी व अंगारा विभाग :- 
 भक्तांच्या सोईकरिता प्रसादपुडी व अंगारा विभाग स्वतंत्र सेवेत आहे.

  

पादत्राने विभाग

भक्तांना त्यांची पादत्राणे ठेवण्याकरीता या विभागा अंतर्गत स्वतंत्र व्यवस्था केलेली आहे. हा विभाग मंदिराच्या परिसरातच असुन पादत्राणे ठेवण्याची नि:शुल्क व्यवस्था आहे.

 

सुरक्षा गृह:

भक्तांना आपले सामान ठेवता यावे म्हणून मंदिर परिसर व भक्तनिवास या ठिकाणी सुरक्षागृहाची व्यवस्था केलेली आहे.

 

   

मुख्य स्टोअर विभाग

 

 

लेखा विभाग

 

 

रोख विभाग

 

 

लेखा अंकेक्षण विभाग

 
 सेवाधारी विभाग

 

 

खरेदी विभाग

 

 

प्रशासकीय विभाग

 

 

प्रासंगिक नियोजन

 

 

भक्तनिवास व भोजन कक्ष व्यवस्था विभाग

 

 

नैतिक शिक्षण व प्रकाशने विभाग

 

 

इन्फ्रास्ट्रक्चर विभाग

 

 

शेती विभाग

 

 

जंगम मालमत्ता विभाग

 

 

आस्थापना विभाग