श्री संस्थेचा इतिहास

सदरहू माहिती संस्थेच्या मूळ कागदपत्रांवरून देत आहोत.

श्रींचे स्मारक व्हावे म्हणून १२/०९/१९०८ रोजी १२ विश्वस्तांची विश्वस्त संस्था एकमताने श्रींच्या समक्षच स्थापन झाली.

या संस्थेचे विशेष म्हणजे "श्री" हयात असताना सन १९०८ मध्येच, हे संस्थान स्थापन झाले, कारण श्रींनी ज्या जागी सध्या श्रींची समाधी आहे त्या जागेचा निर्देश करून "या जागी राहील रे" असे सांगून आपला समाधिदिवस सुद्धा सांगितला होता.

श्रींचे समक्ष श्री गजानन महाराजांचे संस्थानातील व्यवस्था करण्याबद्.दल श्रींच्या परमभक्तांव्दारा शेगांव येथील कै. नारायण कडताजी पाटील, यांच्या अडत दुकानावर श्रींचे भक्त, गावकरी व व्यापारी याची एक संयुक्त सभा 'श्रीं' च्या निर्देशानूसार संवत १८८५ आश्विन शु.१ दि.१२/०४/१९०९ रोजी आयोजित करण्यात आलेली होती व संस्थेचे पहिले कार्यकारी मंडळ स्थापन झाले.

वाडेगांव-बाळापूर परिसरामधून काळा दगड आणून अत्यंत कलाकुसर पूर्ण मंदिराची निर्मिती शिल्पकार- कै. किसन मिस्त्री व कै. खंडू मिस्त्री, नागपूर यांनी केली. समाधी शताब्दी महोत्सवानिमित्त संगमरवरी पाषाणांत मंदिराचे नूतनीकरण व रुंदिकरण करण्यात आले.

 

पहिल्या विश्वस्त सभेत 'श्रीं' नी घालून दिलेले नियम आजही अंमलात आहेत. ते -
      १) 'श्रीं' चे अंगास कोणीही स्पर्श करू नये. २) स्त्रियांनी पश्चिम द्वार व पुरुषांनी पूर्व द्वारामधून दर्शनास प्रवेश करावा. ३) स्त्रियांनी मठात रात्री थांबू नये व इतरांनी तीन दिवसांचे वर. ४) पैशाला स्पर्श करू नका, पैशाचा संचय होऊ देऊ नका व यात्रा थांबू देऊ नका. ५) येथे येणाऱ्या भक्तांसाठी पाणी पाजण्यास एका सेवकाची नियुक्ती करावी. त्यास रुपये तीन मानधन द्यावे ते सभेस मंजुर आहे. असे एकूण ९ नियम आहेत. स्थापनेपासून आजपावेतो विश्वस्तांचे दुमत न होता सर्व ठराव एक मताने मंजूर झालेले आहेत. 'श्रीं' नी येथे गुरू, शिष्य व गादी परंपरा ठेवली नाही. येथे फक्त सेवेची परंपरा आहे.
       ज्या कोणास 'श्रीं' चे दर्शन घ्यायचे असेल किंवा नैवेद्य दाखवायचा असेल त्यांनी (स्त्री असो वा पुरुष असो) बाहेरून दर्शन घ्यावे किंवा नैवेद्य बाहेरून दाखवावा. आतमध्ये कोणी जाऊ नये. हा नियम तेव्हापासून पाळला जात आहे
 

श्री गजानन महाराज संस्थानची स्थापना

श्री गजानन महाराज संस्थानचे सर्वात महत्वाचे वैशिष्ट्य म्हणजे श्री गजानन महाराजांचे समक्ष इ.स.१९०८ मध्ये श्रींच्या दैवी अनुग्रहाने हे संस्थान स्थापन झाले आहे. श्रींनी आपल्या दिव्य योग सामर्थ्याने स्वसमाधि काळ व स्थळाचा पुर्वानुमान व्यक्त केला होता. ‘या जागी राहील‘ हे श्रींचे उद्गार मोठे सूचक होते. श्रींच्या परमभक्तांव्दारा शेगांव येथील कै. नारायण कडताजी पाटील, यांच्या अडत दुकानावर श्रींचे भक्त, गांवकरी व व्यापारी यांची एक संयुक्त सभा श्रींच्या निर्देशानूसार संवत १८८५ आश्विन शु.१ दि.१२/०९/१९०८ रोजी आयोजित करण्यात आलेली होती. श्रींच्या समक्षच संस्थानच्या स्थापनेचा शुभारंभ झाला.